टाकाऊ पदार्थांचे प्रकार :-
टाकाऊ पदार्थांचे खालील प्रकारे वर्गीकरण करता येऊ शकते.
१) घातक टाकाऊ पदार्थ
२) घातक नसलेले टाकाऊ पदार्थ
घटक टाकाऊ पदार्थ हे वनस्पती, प्राणी व माणसांसाठी विषारी असतात. काही विशिष्ठ वायुरूक पदार्थांशी त्यांचा संपर्क आल्यास धोकादायक प्रक्रिया घडतात. काही पदार्थांमुळे जनुकीय बदल आणि विकृती घडू शकतात. खाराखाण्यांतील काही टाकाऊ पदार्थ तसेच वैद्यकीय कचर्यामध्ये विषारी पदार्थ असल्याने ते घटक समजले जतत. वैद्यकीय कचर्यामुळे विविध आजार होऊ शकतात त्यामुळे ते काळजीपूर्वक हाताळले पाहिजेत. काही प्रकारचा घरघुती कचरा सुद्धा घटक प्रकारात मोडतो. त्यामुळे बूट पोलिश, रंगाचे डबे, जुनाट औषधांच्या बाटल्या, रोगांसाठी वापरलेली बँडेज,तसेच आजी माणसांचे टाकलेले कपडे यांचा समावेश होतो.

घटक नसलेल्या टाकाऊ पदार्थांमध्ये घरातील कचरा, रस्त्यावरील कचरा व इतर फेकलेल्या वस्तू, बांधकामे करताना किंवा बांधकामे मोडल्यावर उरलेला राडारोडा इत्यादींचा समावेश होतो. घातक नसलेल्या टाकाऊ पदार्थांचे 'विघातान्शील' व 'अविघातान्शील; टाकाऊ पदार्थ असे दोन प्रकार पडतात. विघातान्शील सेंद्रिय टाकाऊ पदार्थांमध्ये भाज्या व फळांचे उरलेले भाग, सडलेल्या भाज्या, मांस व इतर पदार्थ तसेच बागेतील पालापाचोळा, फांद्या इत्यादी टाकाऊ पदार्थांचा समावेश होतो. गांडुळे, कृमी, मुंग्या, छोटे कीटक तसेच कवच, जीवाणू व विषाणू या टाकाऊ पदार्थांचे विघटन करतात. विघटन झालेले पदार्थ पुन्हा 'जीव-भू-सायन चक्रात' प्रवेश करतात. बहुतांश घरगुती तसेच शेतातील टाकाऊ पदार्थ हे विघातान्शील असतात. सोइसथे म्हणून या पदार्थांना 'ओले टाकाऊ पदार्थ' असेही म्हणतात.
टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट :-
काही पदार्थ मनुष्याच्या विशिष्ट कृतींमधून निरुपयोगी ठरलेले टाकाऊ पदार्थ असतात. पण दुसर्या कार्यासाठी त्यांचा कच्छ माल म्हणून उपयोग होऊ शकतो. अशा पुनर्वापराचे उदाहरण म्हणजे साखर कारखान्यातील मळीपासून 'मद्यार्क' बनवतात. पण ज्यांचा पुढे काय उपयोग होतो माहित नाही. अशा टाकाऊ पदार्थांचे काय? जर असे टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरले गेले नाहीत तर काय होईल? अशा टाकाऊ पदार्थांपासून धोका निर्माण झाला, तर किती नुकसान होईल? टाकाऊ पदार्थ जाळणे हे धोकादायक तसेच बेकायदेशीर आहे. कचरा जाळल्याने उत्पन्न होणार्या धुरामुळे तसेच त्यातील विषारी घटकांमुळे हवेचे प्रदूषण होते. कचरा जाळणे हि चुकीची व्यवस्थापन पद्धती आहे.साचलेल्या टाकाऊ पदार्थांमुळे प्रदूषण होते. होणारे प्रदूषण किंवा इतर दुष्परिणाम हे टाकाऊ पदार्थांच्या गुणवत्तेवर किंवा साठ्यावर अवलंबून असतात. कचरा साठल्याने विविध प्रकारचे टाकाऊ पदार्थ एकत्र येतात. त्यामुळे पुनर्वापर करण्यायोग्य टाकाऊ वस्तू वेगळे करणे अवघड बनते. साचलेल्या कचर्यामुळे अनेक दुष्परिणाम होतात.

No comments:
Post a Comment