मानवी हस्ताक्षेपांमुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास:-
मानवाच्या विविध कृतींचा
परीसंस्थांच्या कायावर विविध पातळ्यांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे
परिसंस्थांचा ऱ्हास होतो. उदा. खाणकाम आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड यांमुळे
जमिनीचा वापर बदलू शकतो. त्यामुळे सजीव आणि निर्जीव घटकांचे संबंधही बिघडतात.
विविध मानवी प्रक्रिया व कृती,
परींस्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करतात. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या
परिसंस्थेत रुपांतर होण्यासाठी ते एखादी प्रजाती नष्ट होण्यापर्यंत असे परिणाम
होतात. उदा. ठाणे – अहमदाबाद शहरांत पाणथळ जागांवर भाराव टाकून वस्त्या उभारण्यात
आल्या, तर बेसुमार व अधिवासावातील बदलांमुळे भारतीय चित्त्याची प्रजातीच नष्ट
झाली.

परीसंसाथांच्या ऱ्हासाला कारणीभूत
ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि कृती :
१) लोकसंख्या वाढ आणि
संसाधनांचा वाढलेला वापर
२) स्थलांतर
३) शहरीकरण
४) औद्योगीकरण व वाहतूक
५) ‘झूम’ प्रकारची शेती
६) पर्यटन
७) मोठी धरणे
८) युद्धे
या प्रक्रियांचा
परीसंस्थांवर परिणाम होत सल्याने त्या काय आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
याचबरोबर नैसर्गिक आपत्ती, मानवी हस्तक्षेप व परिसंस्थांचा ऱ्हास यांमधील परस्पर
संबंध समजून घेणे गरजेचे आहे.

विसाव्या शतकात
लोकसंख्येचा स्फोट होण्यामागे औद्योगिक क्रांती, सुधारलेल्या आरोग्यविषयक सुविधा व
शेतीतील प्रगती यांचा मोठा वाट आहे. १८ व्या शतकात जगाची लोकसंख्या सुमारे १००
कोटी होती. इ.स. २००० मध्ये जगाची लोकसंख्या ६०० कोटींवर गेली. यामुळे
परिसंस्थांचा ऱ्हास होण्याची शक्यता असते.लोकांच्या स्थलांतरामुळेहि जैवविविधता
धोक्यात येते. शहरांमध्ये जिथे थोड्या जागेत खूप लोक राहतात, तिथल्या
परीसंस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले असतात. राहण्याच्या जागेबरोबरच इतर
गरजा म्हणून ओळखले जाणारे जळाऊ लाकूड, पाणी यांची संख्या वाढते. त्यामुळे
त्यांच्या आजूबाजूच्या परीसंस्थांवर परिणाम होतो.त्याचप्रमाणे औद्योगीकारानामुळेहि
परीसंस्थांवर विपरीत परिणाम होतो.खान उद्योगात मोठ्या प्रमाणात जमीन खणली जाते.
खाणीतून काढलेले दगड आणि माती हे बर्याचदा जंगलात किंवा पाणथळ जागेवर टाकले जातात.
या दगडांमधील जड धातू अन्नसाखळीत येऊन त्यांचे ‘जैविक विषसंचयन’ आणि ‘जैविक
विषवृद्धी’ होते आणि त्यामुळे परीसंस्थांचे संतुलन बिघडते.
No comments:
Post a Comment