जैवविविधता:-
अशी कल्पना करा, की एखाद्या
परिसंस्थेत जगन्याण्यासाठी जास्त पाणी लागणाऱ्या एकाच जातीच्या वनस्पती आहेत. जर
काही वर्ष पाऊस कमी पडला तर त्या परीसंस्थेचे काय होईल? त्यातील बर्याच वनस्पती
किंवा सर्वच वनस्पती मरतील. त्यांच्यावर जगणारे अन्नासाखळीतील इतर प्राणीही मरतील.
उत्क्रतींच्या प्रक्रियेमध्ये पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर जैवविविधता निर्माण झली.
या जैवाविविधातेमूळेच परिसंस्था पूर्णपणे कोलमडून पडत नाहीत. पण त्या परिसंस्थेत
इतर जातींच्या वनस्पती असतील, तर त्यांतल्या काही दुष्काळाशी सामना करू शकतील.
त्यामुळे परिसंस्थेवर जरी दुष्काळाचा परिणाम झाला असला तरी तो पूर्णपणे कोलमडून
पडणार नाही.

सजीवांमध्ये आपल्याला जी
विविधता दिसते तिलाच जैवविविधता असे म्हणतात. हि जैवविविधता तीन पातळ्यांवर दिसते.
जैवविविधते मधील पहिली पातळी म्हणजे एकाच जातीतील विविधता. सर्व मानव हे एकाच
जातीतील आहेत. निरीक्षण केले तर सर्व माणसांमध्ये जरी सर्वसाधारण साम्य असले तरी
प्रत्येक मनुष्य हा इतरांपेक्षा वेगळा असल्याचे आढळते. कारण प्रत्येकाला गुण
वैशिष्ट्ये प्रदान करणारा जनुकांचा संच वेगळा असतो. यालाच ‘जनुकीय वैविध्य’ असे
म्हणतात.
यामुळे काय होते? मानवनिर्मित
समस्या तसेच दुष्काळ, तापमानातील चढउतार, इतर प्रजातींच आक्रमण यांसारख्या नैसर्गिक
त्या जातींचे संरक्षण आपत्तीतून त्या जातींचे संरक्षण होते. उदा. तांबडी साळ
नावाची भाताची भाताची जात हि पाण्याची कमतरता असतानाही तग धरून राहू शकते. मात्र
भाताच्या इतर अनेक जाती दुष्काळात तग धरू शकत नाही.
जैवविविधतेची ‘दुसरी पातळी’
परीसंस्थेतच दिसून येते. कोणत्याही परिसंस्थेत निरनिराळ्या प्रकारच्या प्रजातींचे
सजीव राहत असतात. प्रजातींच्या या वैविध्याला ‘प्रजाती विविधता’ असे म्हणतात.
यामुळे काय सध्या होते? वेगवेगळ्या जाती वेगवेगळी पर्यावरणीय भूमिका बजावत असतात.
परीसंस्थेमध्ये उर्जाप्रवाह व पोशांचाक्र प्रवाही प्रवाही राहण्यासाठी प्रत्येक
वैयक्तिक घटकाचा सहभाग असतो. परिसंस्थेत जेवढी अधिक प्रजाती विविधता असेल तेवढा
पोशांचाक्रकांचा प्रवाह सुरळीत राहतो आणि परिसंस्था सुदृढ राहण्यास मदत होते.

जैवविविधतेची ‘तिसरी
पातळी’ खूप मोठे विस्तृत क्षेत्र किंवा संपूर्ण ग्रहाची असते. त्या विस्तृत
क्षेत्रात अथवा ग्रहावर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लहानमोठ्या परिसंस्था असतात.
यालाच परिसंस्थांची विविधता असे म्हणतात. यामुळे काय साध्य होते? प्रत्येक
प्रकारची परिसंस्था तिच्यातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण सजीवांच्या जातीमुळे
एकमेव असते... आपापल्या ग्रहावर जेवढी जास्त जैवविविधता असणारी परिसंस्था असेल
तेवढी उर्जा आणि पोषणद्रव्ये प्रवाहित ठेवण्याची तिचे उर्जां आणि पोषणद्रव्ये
यांच्या व्यवस्थापनाची ठराविक पद्धत तिची क्षमता जास्त असते. परिणामी सजीव सृष्टी
अधिक समृद्ध होईल.
No comments:
Post a Comment