उर्जेचा मनोरा:-
अन्न
साखळीतील प्रत्येक पातळीला ‘पोषण पातळी’ असे म्हणतात. ‘पोषण पातळी’ म्हणजे अन्न
प्राप्त करण्याचा स्तर. परीसंस्थेतील सर्व उत्पादकांची ;’प्रथम’ पोषण पातळी तयार
होते. शाकाहारी प्राण्यांची ‘द्वितीय’ व प्रथम पातळीवरील मांसाहारी प्राण्यांची
‘तृतीय; पोषण पातळी तयार होते.
एखादा सजीव
अन्नसाखळीत ठराविक पोषण पातळीवरच असतो असे नाही. भक्षकांच्या अनेक पटल्या असू
शकतात. उदा. साप जेव्हा गावात खाणार्या सशाला खातो व बेडूक जेव्हा साप खातो तेव्हा
तो चौथ्या पोषण पातळी वर असतो. या उदाहरात गावात प्रथम पातळीवर, नाकतोडा द्वितीय
पातळीवर, बेडूक तृतीय पातळीवर व साप चतुर्थ पातळीवर असतो.

कोणत्याही पोषण पातळीवरील सजीव, सूर्याकडून किंवा आधीच्या पोषण पातालीकडून
मिळालेल्या सर्व उर्जेचे हस्तांतरण करत नाहीत, त्यापैकी काही उर्जा ते स्वतःच्या
जीवन प्रक्रीयांसाठी वापरतात ; उदा. श्वसन, वाढ, हालचाल इत्यादी. काही उर्जा
उष्णतेच्या रुपात शरीराच्या अंतर्गत क्रियांसाठी वापरली जाते. उरलेली उर्जा त्या
सजीवाच्या शरीरात साठवली जाते व ती पुढच्या पोषण पातळीस उपलब्ध होते.
प्रत्येक
पोषण पटली तून बाहेर पडणारी उर्जा ही पोषण पटली ला मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा कमी
असते. उत्पादकांनी सूर्यापासून मिळवलेल्या उर्जेचे प्रमाण हे आकृतीच्या सहाय्याने
दाखवायचे झाले, तर खालीलप्रमाणे ‘मनोरा’ तयार होईल. यास आपण ‘उर्जेचा मनोरा’
म्हणूया. उर्जेचा प्रवाह अन्नासाखालीतून कसा संक्रमित होतो हे लक्षात येते.

No comments:
Post a Comment