Tuesday, 4 November 2014

परिसंस्थेतील उर्जा प्रवाह व पोषणचक्रे

  परिसंस्थेतील उर्जा प्रवाह व पोषणचक्रे :-

      आपल्याला माहीतच आहे, कि प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी लागणारी उर्जा अन्नातून मिळते. हे अन्न येते कुठून? काही सजीव सौर उर्जेचा वापर करून प्रकाश संश्लेशानाच्या क्रियेतून स्वताच्या शरीरातच स्वतःला लागणारे अन्न तयार करतात. त्यापैकी काही अन्न ते स्वतःची उर्जेची गरज भागवण्यासाठी वापरतात. बाकीचे अन्न त्यांच्या शरीरात साठवले जाते. अशा सजीवांना स्वयंपोषी म्हणतात. सामन्यपणे हरित वनस्पती या स्वयंपोषी असतात. सजीव सृष्टीमध्ये ते सजीव ‘उत्पादक’ म्हणून ओळखले जातात.

                 

       जे सजीव स्वताचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत व अन्नासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे स्वयंपोषी वनस्पतींवर अवलंबून असतात, त्यांना ‘परपोषी’ म्हणतात. सजीव सृष्टीमध्ये ते ‘भक्षक’ म्हणून ओळखले जातात. जे सजीव स्वयं पोषी वान्स्पनींवर प्रत्यक्षपणे अवलंबून असतात त्यांना ‘प्राथमिक भक्षक’ म्हणतात; उदा. नाकतोडा, बिया खाणारे पक्षी, हत्ती, फळे खाणारी वटवाघळे इत्यादी. त्यांना ‘शाकाहारी’ असेही म्हणतात.
    ‘मांसाहारी’ प्राणी शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. त्यांना ‘द्वितीय भक्षक’ म्हणतात. उदा. बेडूक, घुबड, कोळ इत्यादी. ज्या मांसाहारी इतर प्राणी खात नाही त्यांना ‘सर्वोच्च भक्षक’ असे म्हणतात. उदा. वाघ, चित्त, गरुड इत्यादी.

                                                   

     मांसाहारी प्राणी शिकार करून शाकाहारी प्राण्यांना खातात, म्हणून त्यांना ‘भक्षक’ व त्यांच्या अन्नाला ‘भक्ष्य’ असे म्हणतात. काही सजीव स्वयं पोषी व पार पोषी जीवांवर जगतात; म्हणजेच ते वनस्पती व शाकाहारी प्राणी यांचा अन्न म्हणून वापर करतात. त्यांना ‘उभायाहारी’ म्हणतात. माणूस हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. दुसरे उदाहरण म्हणजे अस्वल.
    काही सजीव स्वयं पोषी किंवा पर पोषी सजीवांच्या मृत शरीरावर उपजीविका करतात. त्यांना निसर्गातील ‘सफाई कामगार’ असे म्हणतात. या मृतोपजीवींची वाळवी, कावळे, गिधाडे, डुक्कर ही उदाहरणे आहेत. उत्पादक, भक्षक आणि म्रुतोप्जीवीए यांच्यामध्ये कायमच आंतर्क्रिया सुरु असतात; पण या आंतरक्रिया मध्ये प्रक्रियेचा क्रम असतो. त्याला अन्नसाखळी असे म्हणतात.
                   

               z

   मृत सजीवांच्या कुजणाऱ्या घटकांना ‘मृतावशेष’ असे म्हणतात. मृत अवशेषांवर जगणारे सजीव म्हणजे अळ्या, शेल फिश आणि खेकडे होत.


   एखादा सजीव दुसऱ्या एखाद्याच साजीवाकडून खाल्ला जातो असे नेहमी होत नाही; तर तो इतर अनेक सजीवांकडून खाल्ला जाऊ शकतो. उदा. एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पतींची पाने खातो आणि तो कीटक बेडूक, पाल, पक्षी किंवा सस्तन प्राण्यांकडून खाल्ला जाऊ शकतो.

3 comments:

  1. Thanx for to give environmental information..it's useful for environmental projects

    ReplyDelete
  2. *परिसंस्थेतील पुढील भक्षकांपैकी द्वितीय भक्षक कोणता ते ओळखा?*

    1️⃣ हरिण
    2️⃣ ससा
    3️⃣ नाकतोडा
    4️⃣ बेडूक

    ReplyDelete