टाकाऊ पदार्थ साठल्याने होणारे दुष्परिणाम :-

१) जमिनीची अनुपलब्धता :-
कचरा फेकल्यामुळे जमीन व जलाशय प्रदूषित होतत. कचरा फेकलेल्या जागेचा इतर उपयुक्त कारणांसाठी वापर करता येत नाही. राहत्या वस्तीतील पदपथ व रस्ते यांवर कचरा फेकल्यामुळे माणसांना वावरण्यास अडथळा होतो. कचर्यामुळे मोकळ्या जाग्या, मैदाने व परिसर खेळण्यासाठी, मनोरंजनास्थी वापरणे किंवा व्यापारी कामासाठी वापरणे टाळले जाते. प्रदूषणाचे प्रमाण खूप असेल तर अशा जमिनी किंवा जाल्क्षेत्रे पुन्हा चांगली करणे जिकिरीची तसेच खर्चिक बनते.
२) उत्पादकता घटणे :-
शेत जमिनीवर रासायनिक खतांचे अवशेष मोठ्या प्रमाणवर साठले तर ती जमीन प्रदूषित बनते. अशी प्रदूषित जमिन पिकांसाठी निरुपयोगी ठरते. प्रदूषित जलक्षेत्रातील पाण्याचा पिण्यासाठी वापर होऊ शकत नाही. तसेच यामुळे माश्यांचा तसेच इतर जलीय खाद्यपदार्थांच्या उत्पादनावर परिणाम होतो.

३) जीव विविधतेचा ऱ्हास
:-
विषारी टाकाऊ पदार्थांमुळे नैसर्गिक अधिवास नष्ठ पावतात. उद. सांडपाणी, घन कचरा, तेले आणि रासायनिक पदार्थ, प्राण्यांची मृत शरीरे पाण्याच्या साठ्यामध्ये टाकल;यास जलीय परिसंस्था व तेथील जीव विविधतेला धोका निर्माण होतो. पाणथळ जागांमध्ये सांडपाण्यामुळे नत्र व स्फुरद मोठ्या प्रमाणावर वधतात. याचा इतर जलीय वनस्पतींच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.
प्लास्टिकच्या वस्तूंचे पर्यावरणातील प्रमाण फारच वाढत आहे. समुद्राजीवांसह इतर अनेक प्राणी प्लास्टिकच्या वस्तू खातात, परंतु त्या प्राणांच्या पोटात या वासातुंचे पचन होऊ शकत नाही, त्यामुळे ते मरतात. पक्षी कधी कधी घरात्यांसाठी रंगीत प्लास्टिकचा वापर करतात. यामुळे शिकारी पक्षांना घरटे लवकर दिसण्याचा धोका असतो.
४) आरोग्यावरील परिणाम :-
माणसासह इतर प्राण्यांवर टाकाऊ पदार्थांचा अनिष्ट परिणाम होतो. काही वायुरूप घातक पदार्थांमुळे श्वासंमार्गांचे विकार होतात. विषारी धातू, रसायने तसेच रोगकारक जंतूंमुळे प्रदूषित झालेले मासे, भाजीपाला व अन्न खाल्ल्याने अलर्जी, कान्सार्सारखे रोग होऊ शकतात. मुलांमध्ये जन्मदोष निर्माण होऊ शकतो.
५) समाजिक परिणाम :-
शहरात सार्वजनिक काचाराकुन्द्यांमध्ये काही मनसे पानार्चाक्रीत करण्यायोग्य प्लास्टिक, काच, धातू, कागद इत्यादी पदार्थ धुंडाळताना नेहमी अधलतात. हे पदार्थ विकून त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैश्यावर ते गुजराण करतात. कचर्यातील काचेसारख्या धारदार वस्तूंमुळे अनेकदा त्यांना इजा होते. नागरी कचरा गोल करण्याच्या अयोग्य पध्हॆ व निष्काळजीपणे घरगुती कचर्याची विल्हेवाट लावणे यामुळे हि परिस्थिती उद्भवते. पुनर्चाक्रीकरण करण्यायोग्य टाकाऊ पदार्थ योग्य रीतीने वेष्टनात घालून कचरा गोल करणार्यांजवळ दिल्यास समस्या कमी होतील.


आपल्यापैकी प्रत्येक जन कचरा निर्माण करतो. प्रत्येकाने त्या कचर्याचे व्यवस्थापन करायला हवे. अगदी लहानशी वैयक्तिक कृतीसुद्धा पर्यावरण चांगले ठेवण्यास हातभार लवते. आपण पर्यावरणाशी सुसंवाद करणाऱ्या सवयी अंगी बनवू शकतो. सामुहिक प्रयत्नातून कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी बनते. उद. आपल्या मित्र मैत्रिणींशी, शेजार्यांशी बोलून कचर्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यासाठी सामुहिक काम्पोस्तिंग करत येते. आपण सारे मिळून जीव वैद्यकीय कचरा किना औद्योगिक कचर्याच्या अयोग्य विल्हेवाटीसंबंधी तक्रार तक्रार करू शकतो; आणि अशा बाधक कुतींना आला घालू शकतो.